
कोंढवा ते अमेरिका हा ऋतुजाचा प्रवास थक्क करणारा आहे. तिचे आठवीपर्यंतचे शिक्षण कोंढव्यातील महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण अवसरा विद्यालय लवळे, पौड येथे झाले.
कात्रज (पुणे) : पुण्यातील ऋतुजा भोईटे या रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका विद्यापीठाची दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ऋतुजा भोईटे ही कोंढवा (खुर्द) मध्ये राहत असून तिचे वडील पुणे शहरात रिक्षा चालवतात. ऋतुजाने हे यश अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने खेचून आणले असल्याचे मत तिचे आई वडील व्यक्त करत आहेत.
- खासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा
कोंढवा ते अमेरिका हा ऋतुजाचा प्रवास थक्क करणारा आहे. तिचे आठवीपर्यंतचे शिक्षण कोंढव्यातील महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण अवसरा विद्यालय लवळे, पौड येथे झाले. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणासाठी तिला युनायटेड वर्ल्ड स्कूल थायलंड येथे शिकण्यासाठी 50 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. युनायटेड वर्ल्ड थायलंडच्या शिष्यवृत्तीवर तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर आता तिला थेट अमेरिकेतील लेक फॉरेस्ट कॉलेजकडून 2 कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळाली आहे. आता ती थायलंडवरून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. साधारणतः पुढील चार वर्षे तिला प्रतिवर्षी ६५ हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार दरवर्षी ५० लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक व्यवस्थापन या विषयात ती पुढील पदवी शिक्षण घेणार असून या विषयातील शिक्षणासाठीच तिला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
- बापरे, बिबट्यांनी केली पुण्यातील 'या' गावातील रस्त्याची वाहतूक बंद
ऋतुजाचे वडील अरूण भोईटे रिक्षा चालक असून आई नंदा भोईटे या कोंढवा (खु.) येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ऋतुजाला आणखी 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. तिला मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ऋतुजाने तिचे मामा संतोष खोडवे यांचे तिला सातत्याने मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले. तिने तिच्या वाटचालीतील प्रत्येक व्यक्तीचे या यशानंतर आभार मानले आहेत. यानंतर पदव्युत्तरचे शिक्षण हे अमेरिकेतील हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत घेण्याची इच्छा असल्याची इच्छा ऋतुजाने बोलून दाखवली. जिद्दीच्या जोरावर ऋतुजाने मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?
तिच्या यशाचे आम्हाला कौतुक असून अमेरिकेसारख्या देशात आमच्या घरातील माणूसही गेला नाही. तिथे ऋतुजा शिक्षणासाठी जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन बाकी मुलीही मोठे यश संपादन करतील, असा मला विश्वास वाटतो.
- संतोष खोडवे, ऋतुजाचे मामा
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)