विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?

Virat_Tamanna
Virat_Tamanna

कोची : केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यासह मल्याळम अभिनेता अजू वर्गीस यांना नोटीस पाठवली आहे. ऑनलाइन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे. केरळ उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. मणिकुमार यांच्या अध्यक्षतेखाली न्या. अनिल के. नरेंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 

ऑनलाइन रमी खेळ रोखण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. विराट कोहली, तमन्ना आणि अजू वर्गीस हे ऑनलाइन रमी गेमचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. 

थ्रीसूर येथील मूळ रहिवासी असलेल्या पॉली वडक्कन यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. ऑनलाइन रमी खेळ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे यावर कायदेशीर बंदी घालायला हवी. 

एका व्यक्तीने या गेममध्ये पैसे गमावले त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. तमिळनाडू सरकारने सट्टेबाजी सुरू असणाऱ्या ऑनलाइन गेम्स आणि अॅप्सवर बंदी आणली आहे. यामध्ये ऑनलाइन रमी गेमचा समावेश आहे. याबाबत केरळने १९६० मध्येच कायदा बनवला आहे. पण कोणतीही पावले उचलली नाहीत. 

गुगल प्ले स्टोअरमधून काही अॅप्स हटवण्यात आली आहेत. आंध्र प्रदेश सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणली आहे. केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये अशा गेम्सवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

या याचिकेला उत्तर देण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर, राज्य सरकार, राज्य आयटी विभाग, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि ऑनलाइन रमी गेम्स आयोजित करणाऱ्या दोन खासगी कंपन्या जबाबदार राहणार आहेत.

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com