दौंड आयपीएस श्रीकांत पाठक यांना पोलिस पदक

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

श्रीकांत व्यंकटेश पाठक यांचे माध्यमिक शिक्षण मालेगाव (जि. नाशिक) येथे झाले असून ते १९९२ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उप अधीक्षक म्हणून रूजू झाले. नाशिक ग्रामीण येथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी बीड, महाड, श्रीरामपूर, मुंबई, नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी, मुंबई, नवी मुंबई, पुणे (गुन्हे शाखा उपायुक्त ) येथे विविध पदांवर सेवा बजावली आहे. सन २०१४ मध्ये ते महाराष्ट्र पोलिस महासंचालक मानचिन्हाचे मानकरी ठरले होते. दौंड येथे समादेशक पदावर रूजू झाल्यानंतर त्यांनी आरोग्यविषयक उपक्रमांना चालना दिली. रोटरी क्लब आॅफ दौंडच्या वतीने आयोजित दौंड रायझिंग या मॅरेथॅान स्पर्धेसह ते विविध मॅरेथॅान स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. 

श्रीकांत पाठक यांनी जुलै २०१८ मध्ये त्यांनी दौंड ते पंढरपूर हा १४८ किलोमीटरची सायकल वारी सात तासात पार केली होती. या सायकल वारीत त्यांनी बेटी बचाव - बेटी पढाव आणि निसर्ग संवर्धनासंबंधी संदेश दिले होते. श्रीकांत पाठक यांना पदक जाहीर झाल्यानंतर सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
 

Web Title: Daulat IPS Shrikant Pathak gets police medal