
दौंड तालक्यातील न्यू अंबिका कला केंद्रावर गोळीबार प्रकरणात भोर-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे, दरम्यान या प्रकरणात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांची नाहक बदनामी केल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.