दौंड : चर्च ऑफ ख्राईस्टच्याकडून पूरग्रस्तांसाठी पंच्याहत्तर हजार रूपयांचे साहाय्य

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील चर्च ऑफ ख्राईस्टच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी पंच्याहत्तर हजार रूपयांचा निधी जमा करून तो `सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

दौंड (पुणे) : दौंड शहरातील चर्च ऑफ ख्राईस्टच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी पंच्याहत्तर हजार रूपयांचा निधी जमा करून तो `सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

केरळ येथील पुराच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसनाच्या कार्यासाठी चर्च ऑफ ख्राईस्टने आर्थिक साह्य करण्याचे आवाहन केले होते. चर्चच्या सभासदांनी पुढाकार घेत सढळ हाताने मदत करीत एकूण पंच्याहत्तर हजार रूपयांचा निधी जमा केला. सदर निधीचा धनादेश रविवारी (ता. ३०) चर्च मध्ये धर्मगुरू बेंजामिन तिवारी, चर्च ऑफ ख्राईस्टचे अध्यक्ष डॅा. फिलोमन पवार, उपाध्यक्ष विवेकानंद संसारे, सचिव प्रशांत काकडे, आदींच्या हस्ते `सकाळ` प्रतिनिधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रार्थनासभेत केरळ येथील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करून पुनर्वसन कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.     

चर्चचे धर्मगुरू बेंजामिन तिवारी या वेळी म्हणाले,``प्रभू येशू ख्रिस्ताने भूकेले, तहानलेले आणि गरजूंची सेवा करण्याचा संदेश दिलेला आहे. केरळ मधील पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी `सकाळ` रिलीफ फंडाकडे पंच्याहत्तर हजार रूपयांचे आर्थिक साह्य देऊन प्रभूच्या वचनांचे पालन केले जात आहे. `सकाळ`चे दिवंगत संस्थापक - संपादक नानासाहेब परूळेकर यांच्यापासूनची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा विद्यमान अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी जोपासली आहे. ``   

चर्चचे खजिनदार राजेश साळवी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य शालिनी पवार, एलिझाबेथ श्रीवास्तव, रवींद्र कालंके, सुस्मिता बर्नाट, याकोब कांबळे, सॅम्यूएल वूड, शालोमन राठोड, याकोब जगले, जॅान्सन बनसोडे, सुरेश नाईक, आदी या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund: Assistance of Rs.15,000 rupees for the flood victims from Church of Christ