...तर दौंडला मिळतील तीन आमदार

...तर दौंडला मिळतील तीन आमदार

यवत : अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत दौंड विधानसभेची जागा राहुल कुल यांच्या रूपाने भाजपने जिंकली. राहुल कुल दुसऱ्यांदा आमदार झाले असले तरी दौंडमध्ये मात्र प्रथमच कमळ फुलले आहे. निसटता पराभवची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात हुरहुर लागली आहे. या पार्श्वभूमीवर जर पुढील काळात राजकीय फासे अनुकुल पडत गेले तर दौंडला तीन आमदार मिळू शकतात.

केवळ 746 मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास निसटून गेला आहे. अशा परीस्थीतीत विरोधकांनी पुढील काळात जोरदार मोर्चे बांधणी केली तर दौंडमच्या राजकीय स्पर्धेत राष्ट्रवादी  अधिक मागे पडण्याची भिती आहे. तसे होऊ नये म्हणून तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी रमेश थोरात यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. हा निर्णय वरिष्ठांवर अवलंबून असल्याचे सागंत सुळे यांनी त्यावर ठोस भाष्य केले नसले तरी ही मागणी नाकारलेलीही नाही. पक्षश्रेष्ठींनी ही मागणी उचलून धरली तर दौंड तालुक्याला रमेश थोरात यांच्या रूपाने दुसरा आमदार मिळू शकतो. 

2020 मध्ये शिक्षक आमदारासाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी तालुक्यातील गोरख तथा जी. के. थोरात यांना शिक्षक लोकशाही आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जी. के. थोरात हे मुळ खुटबाव (ता. दौंड) या गावचे रहिवाशी असून ते कासुर्डी (ता. दौंड) येथील जयहिंद विद्यालयात उपशिक्षक म्हणून सेवेत आहेत. पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यांना जर यात यश मिळाले तर तालुक्याला जी. के. थोरात यांच्या रूपाने तीसरा आमदार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com