मुंबईकर जावयाने पळवली दोंडजकरांची झोप, कोरोनाचा रिपोर्ट येताच...

covid 19
covid 19

वाल्हे,ता.7: मंगळवारचा दिवस पुरंदरकरांसाठी डोक्याला ताप देणारा ठरला आहे. दिवसभऱामध्ये पुरंदर तालुक्यातील कोरोनाबाधीतांनी 145 चा आकडा गाठला होता. दिवसअखेर आणखीन दोन रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील दोंडज येथील मुंबईकर जावयाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानं दोंडजकरांचे मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. मंगळवार(दि.7)दुपारी पुरंदर तालुक्यातील तब्बल 26 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.त्यामध्ये वाल्हे येथील पॉझिटिव्ह आलेला अहवाल हा मुंबईकराचा होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवारी दिवसअखेर आणखीन दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी धडकली. यामध्ये वाघापुर एक व दोंडजज येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दोंडजसह वाल्हे परिसरातील नागरिकांची मात्र भितीने धांदल उडाली आहे. दोंडज नजिक तरसदरा याठिकाणी तीन दिवसांपुर्वी सुट्टीला आलेल्या मुंबईकर जावयास रक्तदाबाचा त्रास असल्याने तपासणीसाठी जेजुरीनंतर सासवड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र शंका आल्याने त्यांची कोरोना तपासणी साठी नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी तहसिलदार पुरंदर यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दोंडज येथील एक व्यक्ती व वाघापुर येथील एक व्यक्ती यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती दिली.

दोंडज ग्रामपंचायत हद्दीतील तरसदरा नजिक सोनवणेवस्ती येथे आलेल्या जावई पाहुण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका प्रशासनाकडुन कळाल्यानंतरच आम्हाला सदर व्यक्ती गावात आल्याचे समजले असल्याचे सरपंच रेखा जाधव व उपरसरपंच निलेश भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान गावात सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असुन ग्रामपंचायतीच्या वतीने तरसदरासह गावठामध्ये औषध फवारणी करुन निर्जुतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रूग्णाच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तींचा शोध प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सर्वेक्षण केले  जाणार आहे. या पार्श्वभुमीवर ग्रामस्थांनी मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगसह कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडु नये असे आवाहनही ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com