दौंड नगरपालिकेने चार दिवसांत दोनशे वीस मोकाट कुत्री पकडली

daund
daund

दौंड (पुणे) : दौंड शहरात मोकाट कुत्र्यांनी बाजारतळावर वासरांचा फडशा पाडल्यानंतर आणि श्वानदंशाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. स्थानिक तरूणांच्या एका पथकाच्या सहाय्याने नगरपालिकेने ४ दिवसांत २२० मोकाट कुत्री पकडली. 

शहरात मोकाट कुत्री नसलेला एकही भाग नसल्याने नागरिक दररोज श्वानदंशासह अनेक समस्यांना सामोरे जात आहे. मागील आठवड्यात बाजारतळ परिसरातील अवैध मांस विक्री केंद्रांजवळ तळ ठोकून असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीने बाजारतळावर वासरांचा फडशा पाडला होता. या बाबत भाजपचे शहराध्यक्ष फिरोज खान व पदाधिकार्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची लेखी मागणी केली होती. त्यानंतर नगरपालिकेने दहा सदस्य असल्या स्थानिक तरूणांच्या पथकाला मोकाट कुत्री पकडण्याची जबाबदारी सोपवली. या पथकाने मोकाट कुत्री पकडण्यासाठी जाळीचा वापर सुरू केला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते मोकाट कुत्री जाळ्यात पकडत आहेत. जाळीमुळे कुत्र्यांना इजा होत नाही व पकडणात आलेल्या कुत्र्यांच्या चावेचा धोका देखील कमी आहे.

शहरातील भाजी मंडई, बाजारतळ, स्मशानभूमी परिसर, मारूती मंदिर, साठेनगर, कुंभार गल्ली, गांधी चौक, नगरपालिका टाऊन हॅाल परिसर, जनता कॅालनी, सेंट सेबॅस्टियन हायस्कूल परिसर, सरपंच वस्ती, वरदविनायक सोसायटी, आदी भागांमध्ये मागील चार दिवसांत एकूण २२० मोकाट कुत्री पकडण्यात आली आहेत. शहराच्या उर्वरित भागात देखील लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी दिली.  

नगरपालिकेच्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने आणि शहरात अन्यत्र कोंडवाडा नसल्याने पकडलेली कुत्री जंगलात सोडण्यात आली आहेत.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com