दौंडमधील कांदा उत्पादक हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

यवत - दौंड तालुक्‍याच्या नैॡत्य भागातील जिरायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे शेतकरी कांदा पिकवतात. मात्र अतिकमी बाजारभावामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारने दोन रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले असले, तरी ते अत्यंत अपुरे आहेच; शिवाय मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

दौंड तालुक्‍याच्या नैॡत्य भागातील डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, शेलारवाडी, भरतगाव, यवत, भांडगाव, खोर या गावांच्या जिरायती पट्ट्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. कमी वेळेत निश्‍चित आर्थिक उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे पाहतात. मात्र उत्पादन- मागणी यांचे व्यस्त प्रमाण, बाजारयंत्रणा, मध्यस्थांची साखळी, व्यापाऱ्यांची बदमाशी अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने कांद्याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोच. त्यातून कधी भाव वाढलाच, तर ग्राहकांची ओरड सुरू होते.

सरकारने शेतमालाच्या हमीभावासाठी पावले उचलली, तर असे अनुदान किंवा कर्जमाफी देण्याची गरजच भासणार नाही. शेतीमध्ये एक रुपया गुंतवला आणि त्याचा दीड रुपया मिळणार, याची खात्री शेतकऱ्याला मिळाली तर तो सरकारकडून कशाचीच अपेक्षा ठेवणार नाही. मध्यस्थांच्या साखळीपासून पीकनियोजनापर्यंत सरकारने लक्ष घालावे.  
- सागर म्हस्के, उपसरपंच (डाळिंब, ता. दौंड)

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. ही अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. हे अनुदान पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी खात्री वाटते.
 - रवींद्र दोरगे, माजी तालुका अध्यक्ष, भाजप

शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणीनुसार पीक विविधता जपली, तर भाव आपोआप चांगला मिळेल. असे झाले तर हमीभाव, अनुदान, कर्जमाफी अशा गोष्टींसाठी बळिराजाला सकारकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही. 
 - अक्षय भोंडवे, कांदा उत्पादक शेतकरी (कासुर्डी, ता. दौंड)

Web Title: Daund Onion Creator