दौंड रेल्वेची कमाल, प्रवासी वाहतूक बंद असतानाही साडेतीन कोटींची कमाई

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 3 जुलै 2020

दौंड रेल्वे स्थानकास प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, लांब पल्ल्यांचे तिकिट आरक्षण, दंड, आदींद्वारे महिन्याला सरासरी एकूण तीन ते साडेतीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रवासी वाहतुकीतून कोणतेही उत्पन्न नसताना

दौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावरून दूध व साखरेच्या वाहतुकीतून जून महिन्यात रेल्वे मंत्रालयास 3 कोटी 69 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी वाहतुकीतून कोणतेही उत्पन्न नसताना मालवाहतुकीने आधार दिला आहे. 

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव

दौंड रेल्वे स्थानकास प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, लांब पल्ल्यांचे तिकिट आरक्षण, दंड, आदींद्वारे महिन्याला सरासरी एकूण तीन ते साडेतीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रवासी वाहतुकीतून कोणतेही उत्पन्न नसताना निव्वळ मालवाहतुकीतून 3.69 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती स्थानक व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांनी दिली. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

मुख्य वाणिज्य निरीक्षक बेट्टी आॅगस्टीन, मुख्य मालवाहतूक पर्यवेक्षक संजय काकडे, वाणिज्य निरीक्षक सतीश सोनोने यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून जून महिन्यात एकूण 13 हजार 311 क्विंटल साखरेची वाहतूक करण्यात आली. पुणे व नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर एकूण 210 वॅगनमधून दौंडवरून डानकुनि (पश्चिम बंगाल) येथे पाठविण्यात आली. साखर वाहतूक पोटी एकूण 3 कोटी 35 लाख 66 हजार 599 रूपयांचे उत्पन्न मिळाले. दुधाच्या 3 लाख 14 हजार 106 लिटर वाहतुकीतून रेल्वेला भाडेपोटी एकूण 9 लाख 72 हजार 548 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 
 
पश्चिम महाराष्ट्रातून संकलित केलेले दूध दौंड येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक येथे पाठविण्यात आले. रेल्वे मटेरियलच्या वाहतुकीतून 16 लाख 62 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर, फळे व माशांची वाहतूक, पार्सल आणि अन्य वाहतुकीतून 7 लाख 59 हजार 529 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund Railway earns Rs 3.5 crore even though passenger traffic is closed