दौंड : मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मोबाइल टॅावर सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड : थकबाकी वसुलीसाठी मोबाइल टॅावर सील

दौंड : मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मोबाइल टॅावर सील

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी शहरातील दोन मोबाइल टॅावर सील केले आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील नवगिरे वस्ती येथे नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील व कर वसुली विभागप्रमुख हनुमंत गुंड यांनी इंडस टॅावर्स लिमिटेडचा मोबाइल टॅावर सील करून कारवाईला सुरवात केली. नवगगिरे वस्ती आणि पानसरे वस्ती येथील टॅावर सील करण्यात आले. नगरपालिकेने यापूर्वी संबंधितांना नोटीसा दिल्यानंतर ३० ऑगस्ट रोजी थकबाकी वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत. परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करीत थकबाकी भरण्याचे टाळल्याने टॅावर सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. नगरपालिकेचे सागर सोनवणे, प्रवीण खुडे, नितीन तुपसौंदर्य, आदींनी या कारवाईत भाग घेतला.

हेही वाचा: मुंबई महापालिकेला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार ?

दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन, दौंड - शिरापूर रस्त्यालगतचे दोन आणि नवगिरे वस्ती, पानसरे वस्ती, वडार गल्ली, दौंड पोलिस ठाणे समोर प्रदीप प्लाझा, पाटील चौक, ख्वाजा वस्ती, शालीमार चौक, गोपाळवाडी रस्ता, जनता कॅालनी व सरपंच वस्ती येथील प्रत्येकी एक, असे एकूण १४ मोबाइल टॅावर्स आहेत. टॅावरच्या जागामालकांकडे नगरपालिकेची सुमारे १७ लाख ५० हजार रूपयांची थकबाकी आहे. इंडस टॅावर्स लिमिटेड, जीटीएल टॅावर्स, एटीसी टेलीकॅाम, आयडिया, अॅक्मी टॅावर्स यांनी हे टॅावर उभारले असून त्यावरून सर्व मोबाइल कंपन्यांना सेवा दिली जाते.

शहरात बहुतांश मोबाइल कंपन्यांचे कॅाल ड्रॅाप होणे, आवाज न येणे, इंटरनेटची मंद गती, आदी सेवासंबंधी तक्रारी आहेत. त्यात भर म्हणून टॅावर सील करण्यात आल्याने ग्राहकांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top