बाप रे, रेल्वेच्या प्रवासी डब्ब्यातच शिरत होता साप... 

snake
snake
Updated on

दौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानक येथे उद्यान एक्सप्रेसच्या प्रवासी डब्ब्याच्या खाली तीन फूट लांबीचा हरणटोळ जातीचा निमविषारी साप सापडला. परंतु, रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्पमित्रांच्या सहकार्याने तातडीने त्यास बाहेर काढत जीवदान दिले आहे.

बेंगळुरू- मुंबई उद्यान एक्सप्रेस आज (ता. १६) दुपारी सोलापूर येथून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी दौंड रेल्वे स्थानकावर दाखल झाली. फलाट क्रमांक सहावर येण्यापूर्वी एक्सप्रेस रोलिंग इन करणारे कॅरेज अॅण्ड वर्क्स विभागाचे कर्मचारी राजू जाधव यांना एका प्रवासी डब्ब्याच्या खाली व चाकाच्या वर जाळीत हालचाल आढळून आली. त्यांनी गाडी थांबल्यावर पाहिले असता डब्ब्याच्या खाली पिंजऱ्यावर हिरव्या रंगाचा साप दिसल्याने त्यांनी तातडीने सर्पमित्राशी संपर्क साधला. 

परंतु, एक्सप्रेस पुण्याकडे रवाना होण्याची वेळ आल्याने राजू जाधव यांनी रेल्वे कर्मचारी तथा सर्पमित्र सोमनाथ घोरपडे यांना बोलावून सापाला डब्ब्याच्या जाळीतून काढले. दरम्यान एन्व्हॉर्यमेंटल कॉन्सर्वेशन ऑर्गनायझेशनचे करण नगरे व डॅा. श्रीकांत देशमुख यांनी रेल्वे स्थानकात येऊन या सापास ताब्यात घेतले. सदर साप हा प्रवासी डब्ब्यात शिरला असता, तर प्रवासी नाहक घाबरून गेले असते. परंतु, रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यास जाळीतून बाहेर काढले.

दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी महादेव हजारे यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या सापास त्याच्या अधिवासात सोडले जाणार आहे, अशी माहिती एन्व्हॉर्यमेंटल कॉन्सर्वेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख नचिकेत अवधानी यांनी दिली. 

हरणटोळ सापाविषयी...
निमविषारी असलेला हरणटोळ हा साप दाट झुडुपात हिरव्या वेलीसारखा भासत असल्याने तो Green Vine Snake या नावाने ओळखला जातो. या सापाचे डोके लांब व निमुळते, डोळे सोनेरी रंगाचे, तर डोळ्याची बाहुली आडवी असते. याच्या विषाने मृत्यू होत नसला, तरी त्याच्या चावण्यामुळे लहान मुले आजारी पडू शकतात. मोठ्यांना मधमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होऊन सूज येते. हा साप प्रामुख्यानं सरडे, पाली, लहान पक्षी यांची शिकार करतो. झाडावर किंवा दाट झुडुपात आढळणारा हा साप मुख्तः दिनचर आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com