उद्योजकांनो घाबरू नका, तुमच्या मदतीला आहे 'दे आसरा'

mon.jpg
mon.jpg

पुणे : लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी किंवा त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. अटीतटीच्या या काळात कोण पैसे देणार अशा आर्थिक गर्तेत सापडलेल्या उद्योजकांना 'देआसरा फाउंडेशन'चे पाठबळ मिळत आहे. फाउंडेशनने सुरू केलेल्या प्रकल्पातून आत्तापर्यत 100 हून अधिक उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यात आले आहे. त्यातून सुमारे 86 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

आर्थिक अडचणीत असलेल्या देशभरातील उद्योजकांना स्वतःला सावरण्यासाठी पैसे मिळावे यासाठी 'देआसरा' हा हातभार लावत आहे. कोरोनामुळे नुकसान झाल्याने सध्या अनेक छोट्यामोठ्या व्यवसायांना पैशाची गरज आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात आपल्याला मदत कोण करणार असा प्रश्न या उद्योजकांना पडला होता. त्यांची ही अडचण लक्षात घेत गरजू व्यावसायिकला लवकरात लवकर आणि कमीत कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी 'देआसरा'ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी फाउंडेशनने त्यांच्या www.deasra.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.

उद्योजकांना त्यावर सर्व माहिती भरावी लागते. त्याआधारे त्याला किती कर्जाची गरज आहे, याची माहिती समजते व संबंधित उद्योजकाला लवकर कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी फाउंडेशन प्रयत्न करते. कर्ज प्रक्रियेचे माहिती मिळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन फाउंडेशनकडून करण्यात येत आहे. 

याबाबत फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी सांगितले की, “नियोजनात नसलेला खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना करावा लागत आहे. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत व सरकारी कर्जासाठी ते पात्र ठरत नाहीत. अशा उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशन काम करत आहे. उद्योजकांना कशा पद्धतीने मदत करता येईल याबाबत एक सर्व्हे घेण्यात आला होता. उद्योजकाचा आर्थिक प्रवास तपासून त्याला कमीत कमी व्याजदरावर जास्तीत जास्त कर्ज मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही आर्थिक संस्थाबरोबर बोलणी करण्यात आली आहे.

सध्या उद्योजकांना केवळ पैशाचीच नाही तर, आहे त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. कमी पैशात हे सगळं व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. त्यांनी आपले प्रश्न आमच्याकडे मांडावे.-डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक, दे आसरा फाउंडेशन

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com