बुधवार पेठेतील त्या वस्तीबाबत पुणेकरांची मोठी मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने या वस्तीतील रहिवासी व व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये या परिसरात पोलिस आणि पुणे महापालिका प्रशासनाने

पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने या वस्तीतील रहिवासी व व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये या परिसरात पोलिस आणि पुणे महापालिका प्रशासनाने खबरदारीचे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी पुणे सार्वजनिक कल्याण मंडळाचे सदस्य रवींद्र कुलकर्णी यांनी केली आहे.

फी कपातीसाठी मेल भेजो आंदोलन

या परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला आणि इतर तीन जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या साडेचार महिन्यात या परिसरात एकही रुग्ण नव्हते. परंतु, 31 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने व्यापारी वर्ग, या परिसरातील नागरिक व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा धोका टळू शकतो. 

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार

या भागात दोन हजाराहून अधिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. लॉकडाउनच्या काळात आतापर्यंत अनेक सामाजिक संस्थानी मदत केली, परंतु आता शिथिलता आल्याने मदतीचा ओघ कमी होत आहे. त्यातच त्यांच्या 2 ते 3 वर्षाच्या 250 ते 300 मुलांना कात्रज दूध डेअरीतर्फे मोफत दूध दिले जात होते. परंतु, आता ते बंद झाले आहे. त्यामुळे या मुलांच्या आहाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या महिलांना उदरनिर्वाहचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांना भाजीपाला, रेशनकीट, सॅनिटरी पॅड, होम टू होम मेडिकल बॉक्स औषध, कापडी मास्क, सॅनिटायजर, डॉक्टर आदी सोयीसुविधा प्रशासनाने व राज्य सरकारने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, समाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राठी, भोला वांजळे, अलका गुंजाळ, सुरेश कांबळे यांनी या केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for preventive measures in the red light area