स्टार्टअपच्या निधीसाठी सक्षम यंत्रणा हवी

देवांग मेहता सभागृह, सेनापती बापट रस्ता - देआसरा फाऊंडेशन पुरस्कार वितरण.. (डावीकडून) प्रज्ञा गोडबोले, मदन पदकी, रॉनी स्क्रूवाला, प्रियदर्शिनी नहार, डॉ. के. पी. कृष्णन, अशोक साळवी, चंद्रशेखर माने, डॉ. आनंद देशपाडे, सुप्रिया जगदाळे, अंकिता पांढारे
देवांग मेहता सभागृह, सेनापती बापट रस्ता - देआसरा फाऊंडेशन पुरस्कार वितरण.. (डावीकडून) प्रज्ञा गोडबोले, मदन पदकी, रॉनी स्क्रूवाला, प्रियदर्शिनी नहार, डॉ. के. पी. कृष्णन, अशोक साळवी, चंद्रशेखर माने, डॉ. आनंद देशपाडे, सुप्रिया जगदाळे, अंकिता पांढारे

पुणे - उद्योजक किती जणांना प्रेरित करतो, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे उद्योगजगतात हारजीत नसते. उद्योग- व्यवसायासाठी असलेल्या परवान्यांसारखी कामे अधिक सुखकर व्हावीत; तसेच स्टार्टअपला निधी उपलब्ध होण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचा सूर उद्योगजगताविषयी आयोजित चर्चासत्रात उमटला.
लघुउद्योजक म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या पाच उद्योजकांना "देआसरा फाउंडेशन'कडून "उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.

प्रियदर्शिनी नहार, अशोक साळवी, चंद्रशेखर माने, सुप्रिया जगदाळे, अंकिता पांढारे व अक्षय पांढारे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी "उद्योजकता व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. स्वदेस फाउंडेशनचे संचालक व व्यावसायिक रॉनी स्क्रूवाला, कौशल्य व उद्योजकता मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. के. पी. कृष्णन, ग्लोबल अलायंस फॉर मास आंत्रप्रनूअरशिपचे सहसंस्थापक मदन पदाकी आणि फाउंडेशनचे संस्थापक व पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी चर्चासत्रात भाग घेतला. "देआसरा'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले या वेळी उपस्थित होत्या.

व्यावसायिक म्हणून काम करताना येणारी आव्हाने, अडचणी व त्यावरचे योग्य उपाय याबद्दल चर्चासत्रात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. स्क्रूवाला म्हणाले, 'पहिल्या पिढीतील व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्यवसाय करणे अवघड होत असल्याने अनेक कंपन्या परदेशात जात आहेत. ग्रामीण भाग आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे.''

डॉ. देशपांडे म्हणाले, 'पैसे कसे मिळवायचे, असा अनेक स्टार्टअप समोर प्रश्‍न आहे. ई-व्यवहारांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.''

डॉ. कृष्णन म्हणाले, 'कौशल्य व उद्योजकता मंत्रालयाने व्यवसायासाठीचे सर्व विभाग एका छताखाली आणले आहेत. सरकारने काय करायला हवे, हे देआसरा फाउंडेशनसारख्या संस्था सांगत आहेत.''
'जगातील सर्वच उद्योगांसमोर विविध प्रकारची आव्हाने आहेत. या समस्या दूर करायच्या असेल तर व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे. मात्र, त्यासाठी तेवढे प्रयत्न होत नसल्याचे दिसते,'' असे मत पदाकी यांनी मांडले. प्रज्ञा गोडबोले यांनी या वेळी फाउंडेशनच्या कामाविषयी माहिती दिली.

देवांग मेहता सभागृह, सेनापती बापट रस्ता - "देआसरा फाउंडेशन'कडून लघुउद्योजकांना "उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. या वेळी (डावीकडून) प्रज्ञा गोडबोले, मदन पदाकी, रॉनी स्क्रूवाला, प्रियदर्शिनी नहार, डॉ. के. पी. कृष्णन, अशोक साळवी, चंद्रशेखर माने, डॉ. आनंद देशपांडे, सुप्रिया जगदाळे, अंकिता पांढारे, अक्षय पांढारे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com