कार अपघातातील तरुणाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

एक ऑगस्टला संकेत असवले, अक्षय जगताप व अक्षय ढगे हे तिघे महाविद्यालयातून माघारी येताना त्यांची कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली. त्यात सुदैवाने अक्षय ढगे बचावला. मात्र, संकेत असवलेचा मृत्यू झाला. मात्र, अक्षय जगताप बेपत्ता होता.

टाकवे बुद्रुक (मावळ, पुणे) : येथील इंद्रायणी नदीत पडून कारच्या अपघातात बेपत्ता असलेल्या अक्षय जगतापचा मृतदेह शुक्रवारी (ता. 9) नवव्या दिवशी दोन किलोमीटर अंतरवारील राजपुरी बेलजजवळ नदीपात्रात सापडला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक ऑगस्टला संकेत असवले, अक्षय जगताप व अक्षय ढगे हे तिघे महाविद्यालयातून माघारी येताना त्यांची कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली. त्यात सुदैवाने अक्षय ढगे बचावला. मात्र, संकेत असवलेचा मृत्यू झाला. मात्र, अक्षय जगताप बेपत्ता होता. एनडीआरएफ, शिवदुर्ग रेस्क्‍यू पथक, आयएनएस शिवाजी व मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकर्ते नदीत अक्षयचा शोध घेत होते. तसेच टाकवे बुद्रुक येथील तरुण व अक्षयचे नातेवाइकही शोध घेत होते. अखेर मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतला.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body of a missing found after 9 days