वडगाव आनंद जवळ मृत बिबटया आढळला

दत्ता म्हसकर
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्य वळणाजवळ वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी ता.3 रोजी रात्री एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ओतुर वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे बापु येले व कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा करून बिबट्याला शवविच्छेदनासाठी नेले. 

ओतुर वनपरिक्षेत्राचे अधिकारी बापु येले व माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले की, हा अडीच वर्षाचा नर बिबट असुन या बिबट्याच्या मानेवर व पोटाला नख्यांचे घाव आहेत. दुसऱ्या बिबटच्या बरोबर झालेल्या संघर्षात त्याचा मृत्यु झाला असावा. उदापुरला  बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: The dead leopards were found near wadgaon aanad