Alephata News : बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर

बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यवसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली.
dead rat was found in a pile of snow
dead rat was found in a pile of snowsakal

- राजेश कणसे

आळेफाटा - बेल्हे (ता. जुन्नर) या ठिकाणी एक सरबत, ज्यूस व बर्फाचे गोळे बनवणारा व्यवसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादी मध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यवसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली.

सदर मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लहान मुले व प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? बर्फ बनविणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा किंवा राजेश निषाद यांनी आणलेला बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेला उंदीर-घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे असतानाही सदर बर्फ विकण्याचे काम चालू होते.

सध्या कडक असा उन्हाळा चालु असल्याने दुचाकी किंवा चारचाकीमधून प्रवास करताना घशाला सारखी कोरड पडत असते, पर्यायाने रस्त्याच्या कडेला असणारे लिंबू पाणी, सरबत, नीरा स्टाॕल, उसाचा रस लक्ष वेधून घेतात व एकाच वेळी दोनदोन ग्लास रीचवून आपण पुढच्या प्रवासाला निघतो पण लिंबू पाण्यातले व सरबताचे पाणी कशाचे आहे, कोठून आणले आहे, त्यात साखरच आहे का? किंवा त्यात सॕक्रीनसारखा पदार्थ मिसळला आहे.

तसेच बर्फ बनविताना वापरलेले पाणी शुद्ध होते का? बर्फ साठविण्याची जागा चांगली आहे का? त्याठिकाणी मोकाट कुत्री, डुकरे येऊन बसतात का? लिंबू पाणी किंवा सरबत बनविणा-याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का? त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का? यापैकी एकाही गोष्टींचा आपण विचार न करता डोळे झाकून पिऊन टाकता.

याविषयी संबधित खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला, तेंव्हा रस्त्यावरील लिंबू पाणी, बर्फ घातलेला उसाचा रस,आकर्षक बाटल्यामधील सरबत व नीरा पिताय पण सावधान जरा जपूनच, कारण आपले आरोग्य आपणच सांभाळले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com