घोरपडीत लोहमार्गालगत आढळला लष्करी जवानाचा मृतदेह; आत्महत्येची शक्यता

पांडुरंग सरोदे
रविवार, 29 जुलै 2018

पुणे : घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळुन आला. जवानाने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

पुणे : घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळुन आला. जवानाने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

घोरपडी लोहमार्गलगत रविवारी सकाळपासून दुर्गंधी येत होती. रेल्वेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर तेथे कुजलेल्या अवस्थतील एक मृतदेह आढळुन आला. याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी एका लष्करी जवानाचा मृतदेह असल्याचे आढळुन आले. याबाबत लष्करला माहिती देण्यात आली. त्यानंतर लष्करी जवान मोठया संख्येने दाखल झाले. त्यांनी लोकांना घटनास्थऴापासून दूर ठेवले.

दरम्यान लष्करी जवान मोठ्या संख्येने लोहमार्गावर आल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाची चर्चा सुरु होती. मृत व्यक्तीची ओळख पटु शकली नाही, मात्र त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढिल तपास चालु आहे.

Web Title: deadbodie of the military jawan found near railway track in ghorpadi