विधीसाठी अर्ज भरण्याची 5 जुलैपर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे, ता. 3 : विधी शाखेतील पाच वर्षांच्या पूर्णवेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारपर्यंतची (ता.5) मुदत दिली आहे. 

पुणे, ता. 3 : विधी शाखेतील पाच वर्षांच्या पूर्णवेळ एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारपर्यंतची (ता.5) मुदत दिली आहे. 

सीईटी सेलने राज्यातील विधी महाविद्यालयांतील पाच वर्षांच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करता येईल. तसेच, विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी येत्या सोमवारी (ता.9) जाहीर होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रियेबाबतचे आक्षेप 17 ते 20 जुलैदरम्यान नोंदविता येईल. त्यानंतर प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 24 जुलैला जाहीर होणार आहे. 

- विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://www.mah-llb5admission.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 

प्रवेशाचे वेळापत्रक 
- ऑनलाइन नोंदणी व प्रवेशासाठीची कागदपत्रे अपलोड करणे : 5 जुलै 
- कागदपत्रांची पडताळणी : 24 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) 
- प्राथमिक सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर : 9 जुलै 
- प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 24 जुलै 
 

Web Title: The deadline for law of application for July 5