'फूड सेफ्टी' लायसन्सच्या रिन्युअलला 'या' तारखेपर्यंत मुदत वाढ

अक्षता पवार
रविवार, 2 ऑगस्ट 2020

- 'फूड सेफ्टी' परवान्यांच्या नूतनीकरणाला ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ
- 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळा'च्या प्रयत्नांना यश

पुणे : फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस एथॉरिटी ऑफ इंडिया'(fssai) कडून फूड सेफ्टी परवान्यांच्या नूतनीकरणाला 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. नूतनीकरणाची ही मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपणार होती. 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळा'च्या शिष्टमंडळाने मुदतवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ'चे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा, महासचिव व्ही के बन्सल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत डुबल म्हणाले, "कोरोना साथीच्या संकटात खाद्यान्न, पेय निर्मिती क्षेत्रातील उद्योगांना आपले उत्पादन सलग पाच महिने बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे अडचणींचा विचार करून 'अन्न पदार्थ सुरक्षा' विषयक परवान्यांचे नूतनीकरण करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी फेडरेशनने सातत्याने केली होती. यासाठी फेडरेशनच्या शिष्ट मंडळाने एफएसएसएआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या क्षेत्रातील उद्योगांना त्यांचे वार्षिक विवरण पत्र जमा करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एफएसएसएआयचे कार्यकारी अधिकारी डॉ शोबित जैन यांनी याबाबतचा आदेश 31 जुलै रोजी काढला.

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

(edited by : sharayu kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for renewal of food safety licenses extended till 31st December