विजेच्या धक्क्याने 55 मेंढ्यांचा मृत्यू 

KAD19A00005.jpg
KAD19A00005.jpg

कडूस : कडूस-टोकेवाडी (ता. खेड) येथील आवटे मळ्यात वीजवाहिनीची तार मेंढ्यांच्या कळपावर पडून विजेच्या धक्‍क्‍यामुळे दोन सख्ख्या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्‍यात बचावले. 
दरम्यान, कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात वीजवाहिनीची तार तुटून हा अपघात झाला. वीजप्रवाह सुरू असलेली 

ही तार शेतात असणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्‍क्‍यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागीच मरण पावल्या. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या वीजवाहिनीपासून थोड्या अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून सुदैवाने बचावले.

घटनेबाबत माहिती मिळताच, कडूस विकास सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती नेहेरे, माजी उपसरपंच पंडित मोढवे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत तिखोळे कुटुंबाला धीर दिला. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व नुकसानग्रस्त मेंढपाळांनी केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com