भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 

संदीप घिसे 
रविवार, 25 मार्च 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा आपल्या घराच्या बाहेर रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खेळत होता. त्यावेळी अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला चढविला.

पिंपरी - भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माण येथे घडली. साहिल भुट्टो अन्सारी (वय 5 रा. मोहिते वस्ती माण, तालुका मुळशी) असे हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा आपल्या घराच्या बाहेर रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खेळत होता. त्यावेळी अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला चढविला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे पालक त्याला सोडवण्यासाठी आले. तोपर्यंत भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर जोरदार हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. साहिल यास उपचाराकरता वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत. साहिल यास सुरवातीला माण येथील सरकारी रूग्णालयात नेले होते. तेथे एक तास उपचार न झाल्याने साहिलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या आईने केला.

Web Title: The death of the baby in the attack of street dogs