पतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू

boy.jpg
boy.jpg

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी(lता.16) दुपारी पावणे बारा वाजता कात्रज परिसरात घडली. 

ओम धनंजय आतकारे (वय 12, रा. कात्रज) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम व त्याचा मोठा भाऊ आदित्य हे दोघेही पतंग उडविण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्यावेळी आईने कामानिमित्त बोलाविल्यामुळे आदित्य घरी गेला. ओमने सकाळी नाश्‍ता केला नसल्यामुळे आईने आदित्यला पुन्हा ओमला बोलाविण्यासाठी माघारी पाठविले. त्यावेळी आदित्यला ओम दिसून आला नाही. मात्र पतंग व मांजा संबंधीत ठिकाणीच होता. आदित्यला शंका आल्याने त्याने टेरेसवरुन खाली पाहीले, त्यावेळी त्यास ओम खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ खाली येऊन आपल्या आईला माहिती दिली.

आदित्य, त्याची आई व अन्य नागरीक इमारतीच्या खाली आले, त्यावेळी ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यास तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे ओमचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com