DETH BODY
DETH BODY

मृतदेहाच्या दफनसाठी जागाच शिल्लक नाही

नायडू मुस्लिम दफनभूमीसाठी पाच गुंठे जागेची मागणी
Published on

कोरेगाव पार्क : नायडू येथील मुस्लिम दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे दफनभूमीसाठी अतिरिक्त पाच गुंठे जागा देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती शाहीन फ्रेंडन्स क्लब महेबुब नदाफ यांनी दिली.

नायडू येथील दफनभूमीला वीस वर्षांपूर्वी दीड ऐकर जागा दिली होती. तर ख्रिश्‍चन दफनभूमीसाठी दोन ऐकर जागा महापालिकेने दिली होती. मात्र नायडू दफनभूमीत मंगळवार पेठ, पाटील इस्टेट आणि ताडीवाला रस्ता परिसरातील

DETH BODY
रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी वाघोलीत आतापर्यंत 5 जण पकडले; नागरिकांचा तीव्र संताप

मुस्लिम समाजातील मृतदेहांचे दफन केले जाते. त्यामुळे येथील दफनभूमित आता जागाच शिल्लक नाही. त्यामुळे मृतदेहाचे दफन करण्याची समस्या निर्माण झाली आहे.

या संदर्भात नदाफ म्हणाले, ‘‘ महापालिकेने मुस्लिम समाजासाठी दीड ऐकर जागा दिली होती. मात्र लोकसंख्येचा विचार करता ही जागा अपुरी होती. ख्रिश्‍चन समाजाला दिलेल्या दोन ऐकर जागेपैकी खूप जागा शिल्लक आहे. त्यांच्या दफनभूमीशेजारील पाच गुंठे जागा मुस्लिम दफनभूमीला द्यावी. तर ख्रिश्‍चन दफनभूमीशेजारील अतिरिक्त पाच गुंठे जागा त्या बदल्यात त्यांना द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली आहे.’

DETH BODY
'ऑक्सिजनची पातळी होती कमी पण मी जिंकलो'

‘‘ गेल्या वर्षांपासून अनेकांचे मृत्यू झाल्यामुळे सध्या मुस्लिम दफनभूमीत जागा नाही. या संदर्भात महापालिकेच्या भवन विभागाशी पत्रव्यवहार केले आहे. यामध्ये ख्रिश्‍चन दफनभूमीतील जागा देण्याची विनंती केली आहे.’’

- दयानंद साेनकांबळे, सहायक महापालिका आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय

Marathi News Esakal
www.esakal.com