वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकांचा मृत्यु

संतोष आटोळे 
सोमवार, 11 जून 2018

शिर्सुफळ : कटफळ (ता बारामती) पारवडीकडे जाणाऱ्या मार्गावर परिटवस्ती शिर्सुफळ फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्या अपघात झाला. या अपघातात पारवडी येथील सेवानिवृत्त शिक्षक रामदास सिताराम पाळेकर (वय 78) यांचा जागीच मृत्यु झाला.
 याबाबत सविस्तर माहिती अशी, की सेवानिवृत्त शिक्षक रामदास पाळेकर हे आपली दुचाकी क्र.एम.एच 12 बी.एस.9598 वरुन कटफळ येथील आठवडे बाजारवरुन रविवार (ता.10) रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आपल्या पारवडी येथील निवासस्थानी निघाले होते. याचवेळी बारामती कटफळ कडुन भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने पाठीमागुन धडक दिली. 

यामध्ये पाळेकर जोरात बाजुला फेकले गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान याबाबत बारामती तालुका पोलिस स्टेशनला भगवान रामदास पाळेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास बिट अंमलदार कुंभार करीत आहेत.

वाळु वाहतुक गाडीने घेतला बळी?

शिर्सुफळ येथून मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतुक सुरु आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच सदर वाळू वाहतुक करणारे रस्त्यावरुन वाहन चालविताना कोणाचाही विचार न करता वाहन भरधाव वेगाने चालवित असतात. यावर पोलिसांचे, परिवहन विभागाचे, किंवा महसुल विभाग यापैकी कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने अवैध वाळू वाहतुक जोमात सुरु आहे. सदर अपघातात वाळू वाहतुक गाडीनेच बळी घेतल्याची चर्चा आहे. तसेच अनेकांनी गाडी नंबरही पाहिला आहे. मात्र दहशतीमुळे कोणीही बोलायला तयार नाहीत. यामुळे आता पोलिसांनीच आपल्या कर्तव्याप्रती संबंधित वाहनासह चालक मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.    

Web Title: Death of retired teachers in road accident