पुणे : भरधाव रिक्षाची झाडाला धडक, रिक्षाचालकाचा मृत्यू 

death of rickshaw driver in accident at pune.jpg
death of rickshaw driver in accident at pune.jpg

पुणे : भरधाव रिक्षा चालवित असताना चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजता फातिमानगर चौकातील शिवरकर रस्त्यावर घडली. 

यतीराज संतराम भिसे (वय 29, रा. हेवन पार्क, महमदवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुमीत नवघरे (वय 29, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी पहाटे दोन वाजता कामावरुन घरी जात होते. ते वानवडीतील फातिमानगर चौकातून डावीकडे वळून शिवरकर रस्त्यावरुन जात होते. ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत भरधाव रिक्षा चालवित असताना त्याचे नियंत्रण सुटले.  त्याची रिक्षा कॉसमॉस बँकेसमोर असलेल्या एका झाडास जोरदार धडकली.

अपघातामध्ये रिक्षाचालकाच्या हाताला, पायास व डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यास खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com