महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली टॉयशॉपमध्ये; एका महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

लक्ष्मी रस्ता व केळकर रस्ताच्या अंतर्गत भागातील लोखंडे तालीम जवळ शनिवारी सायंकाळी एका महिलेचे कारवरील नियंत्रण सूटल्याने कार भरगर्दीत कार अंबिका टॉयज नावाच्या दुकानात घुसली. त्यावेळी, काकडे या त्यांच्या पतीसमवेत जात होत्या. कारने त्यांना ही उडविले. त्याचवेळी कारने काकडे यांनाही जोरदार धडक दिली.

पुणे : भरगर्दीमध्ये चालक महिलेचे नियंत्रण सुटल्यामुळे खेळण्याच्या दुकानात घुसलेल्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी नारायण पेठेतील लोखंडे तालीम येथे घडली.

दिपा गणेश काकडे (वय 53, रा. नारायण पेठ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता व केळकर रस्ताच्या अंतर्गत भागातील लोखंडे तालीम जवळ शनिवारी सायंकाळी एका महिलेचे कारवरील नियंत्रण सूटल्याने कार भरगर्दीत कार अंबिका टॉयज नावाच्या दुकानात घुसली. त्यावेळी, काकडे या त्यांच्या पतीसमवेत जात होत्या. कारने त्यांना ही उडविले. त्याचवेळी कारने काकडे यांनाही जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांना रिक्षातून एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे 'आइसीयू'मध्ये जागा नसल्याने डेक्कन येथील रुग्णालयात हलविण्यात आले. काकडे यांना अंतर्गत दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, कारचालक महिला व दुकानचालक हे एकाच परिसरात राहणारे व ओळखीचे असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. तर, दूसरीकडे कारची धडक बसलेल्या महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही, त्या फक्त घाबरल्याने त्यांना रुग्णलयात नेले असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, महिला डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालयात हलविल्याने प्रारंभी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, डेक्कन पोलिसांमध्ये याप्रकरणी खबर मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिस रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरु असतानाच महिलेचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a woman due to lost control on car hit to ToyShop In Pune