विमान अपघातात दगावलेल्या विद्यार्थ्याला कर्जमाफी 

यशपाल सोनकांबळे 
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - ताडीवाला रस्ता येथील झोपडपट्टीत दहा बाय दहाची खोली, वडील बेकरीचालक, आठ जणांचे कुटुंब, पदरी अठराविश्‍व दारिद्य्र. तरीही वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलेल्या सोहेल अन्सारीचा वयाच्या 19 व्या वर्षी 

वैमानिक प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या तब्बल साडेचार वर्षांच्या अथक संघर्षानंतर आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या सहकार्याने अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्यानंतर "स्टेट बॅंक ऑफ इंडिया'च्या दहा लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जाला माफी मिळाली आहे. 

या संघर्षाबद्दल "सकाळ'शी बोलताना अन्सारी म्हणाले, ""मला दोन मुले आणि तीन मुली आहेत. सोहेलचे "आकाशात भरारी'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आई आणि बायकोचे दागिने विकून, नातेवाइकांकडून व्याजावर पैसे उभे केले. तसेच जिवलग मित्र सुभाष जमदाडे याने त्याचा राहता फ्लॅट गहाण ठेवून रायबरेलीतील "इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी'मध्ये 31 लाख 50 हजार रुपये भरले. गोंदिया बिरसी विमानतळावर विमान चालविण्याच्या सरावादरम्यान मध्य प्रदेशातील छिंदवाड्याच्या पंचमढी जंगलात विमान कोसळून सोहेलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हे पैसे परत मिळावे म्हणून तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांचीदेखील भेट घेतली; परंतु आश्‍वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही.'' 

अर्थ व वित्त स्थायी समितीमध्ये सदस्य असल्यामुळे अरुंधती भट्टाचार्य आणि अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटून अन्सारी यांना न्याय देऊ शकलो. आता अकादमीत भरलेले शुल्क परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
अनिल शिरोळे, खासदार पुणे लोकसभा. 

घटनाक्रम - 
- 2012 - सोहेलची अकादमीत निवड 
- 2013 - सरावादरम्यान विमान कोसळून सोहेलचा मृत्यू 
- 24 डिसेंबर 2013 - भारतीय हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे विमानाच्या अवशेषांचा शोध 
- 25 डिसेंबर 2013 - बिश्‍नोरला (उत्तर प्रदेश) अन्सारी यांच्या मूळ गावी सोहेलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. 

Web Title: Debt waiver for student convicted in plane crash