डेक्कन क्वीनमध्ये प्रथमच चेकर आणि पोलिस महिला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - भारतीय रेल्वेची शान ओळखल्या जाणाऱ्या "डेक्कन क्वीन'ने बुधवारी आणखी एक इतिहास घडवला. महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने या गाडीवर पहिल्यांदाच आठ महिला चेकर (टीसी) आणि महिला पोलिस यांची नियुक्ती केली. 

डेक्कन क्वीन या गाडीने अनेक उच्चांक नोंदविले गेले आहेत. या गाडीवरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती साठ दिवस आधी निश्‍चित केली जाते. परंतु महिला दिनाचे औचित्य साधून या गाडीवर महिलांना संधी देण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यांची दखल घेऊन रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक (विभागीय) कृष्णांथ पाटील आणि मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांनी आज डॉ. सीमा अरोरा यांच्या नेतृत्वाखाली आठ तिकीट चेकर, एक महिला पोलिस यांची नियुक्ती या गाडीवर केली. डेक्‍कन क्वीन आणि रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारे सर्व महिलांची नियुक्ती प्रथमच करण्यात आली. 

डेक्कन क्वीन ही गाडी दररोज सकाळी सव्वासात वाजता पुणे स्टेशनवरून सुटते. आज सकाळी या गाडीवर नेमणूक करण्यात आलेल्या सर्व महिला चेकर यांनी गुलाब आणि चॉकलेट देऊन प्रवाशांचे स्वागत केले.

Web Title: Deccan Queen for the first time checker and police women