‘डेक्कन क्वीन’ धावणार नवीन रंग-ढंगात

नव्या ढंगात जानेवारी २०२२ पासून क्वीन प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार होती. मात्र प्रवाशांना २२ जूनची वाट पाहावी लागणार आहे.
Deccan Queen
Deccan QueenSakal
Summary

नव्या ढंगात जानेवारी २०२२ पासून क्वीन प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार होती. मात्र प्रवाशांना २२ जूनची वाट पाहावी लागणार आहे.

पुणे - पुणे-मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेसचे (Deccan Queen Express) पारंपरिक कोचेस (Coach) बदलण्यात येणार असून, त्याऐवजी एलएचबी कोच जोडण्यात येणार आहेत. या कोचसह ही क्वीन २२ जूनपासून धावणार आहे.

नव्या ढंगात जानेवारी २०२२ पासून क्वीन प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार होती. मात्र प्रवाशांना २२ जूनची वाट पाहावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनचा रंगसंगतीत बदल करण्यात आला. पारंपरिक निळ्या आणि पांढऱ्या रंगात धावणारी डेक्कन क्वीन आता नवीन रंगा-ढंगात धावणार आहे.

अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) येथे डेक्कन क्वीनची रंगसंगती निश्‍चित केली आहे. ‘फॉरेस्ट ग्रीन’, पिवळा आणि लाल हे रंग आता कोचेसवर दिसणार आहेत. मागील महिन्यात नवीन कोचेस देखील मध्य रेल्वेत दाखल झाले आहेत. २२ जूनपासून मुंबईतून आणि २३ जूनपासून पुण्यातून क्वीन कोचेस जोडण्यात येणार आहेत. यामध्ये ४ वातानुकूलित आसन, ८ द्वितीय श्रेणी आसन, एक व्हिस्टाडोम कोच, एक वातानुकूलित डायनिंग कार, एक गार्ड कम ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार, अशी एक्‍स्प्रेसची संरचना असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

१ जूनपासून एलएचबी कोच जोडा

डेक्कन क्वीनचा वाढदिवस १ जूनला साजरा करण्यात येतो. त्यामुळे २२ जूनऐवजी १ जूनपासूनच क्वीनला एलएचबी कोच उभारण्यात यावेत, अशी मागणी रेल्वे ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे. १९३० साली सुरू झालेल्या डेक्कन क्वीनचा यंदा ९३ वा वाढदिवस आहे. त्यामुळे हे कोच जोडल्याने वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करता येईल. तसेच प्रवाशांच्या संख्या लक्षात घेता १७ कोच ऐवजी २५ कोचची क्वीन करण्यात यावी, अशी मागणी शहा यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com