पाचवीचा वर्ग प्राथमिकला जोडण्याच्या निर्णयाचे 'या' महासंघाने केले स्वागत!

Students_Schools
Students_Schools
Updated on

पुणे : इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याला काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला. मात्र, या निर्णयाचे खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर आणि सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर याप्रमाणे देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. पण पुढारलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत याप्रमाणे अंमलबजावणी होत नव्हती. संचमान्यतेमध्ये शिक्षक निश्चिती ही विद्यार्थी संख्येवर अवलंबून असते.

पाचवी माध्यमिकला असल्यामुळे प्राथमिक शाळांचा पट कमी दिसत होता. हा प्राथमिक शाळांवर अन्याय होत होता. याबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे वतीने राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे प्राथमिक शाळांचा पटही वाढणार आहे. तसेच शालेय पोषण आहारात पहिली ते पाचवीसाठी वेगळे आणि सहावी ते आठवी अनुदान वेगळे येते. आतापर्यंत पाचवीचा वर्ग माध्यमिकमध्ये असल्यामुळे त्याची नोंद वेगळी ठेवावी लागयची, परिणामी गोंधळ उडत होता, असे महासंघाचे राज्य सहसचिव विकास थिटे यांनी सांगितले.

केंद्रीय नवोदय विद्यालय, केंद्रीय शाळा यामध्ये माध्यमिक स्तर हा सहावी ते बारावी असाच आहे. त्याचप्रमाणे शासनाची शिष्यवृत्ती परीक्षासुध्दा प्राथमिकचा शेवटचा वर्ग म्हणजे पाचवी आणि उच्च प्राथमिकचा शेवटचा वर्ग आठवी या वर्गांना आहे. सध्या प्राथमिक शाळा पहिली ते चौथी असल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा नसल्यामुळे या शाळांची गुणवत्ता दाखविणे शिक्षकांना अवघड जात आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करता शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे थिटे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com