esakal | बारामतीत कोरोनाचा विस्फोट, लॉकडाउनबाबत प्रशासन घेतंय हा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

lock down

बारामतीत गेल्या तीन दिवसात कोरोनाचे तब्बल 297 रुग्ण सापडले. त्यामुळे आज प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णांचा विस्फोट पाहता प्रशासन आता काही निर्णय घेणार, हे स्पष्ट झाले आहे. 

बारामतीत कोरोनाचा विस्फोट, लॉकडाउनबाबत प्रशासन घेतंय हा निर्णय

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामतीत गेल्या तीन दिवसात कोरोनाचे तब्बल 297 रुग्ण सापडले. त्यामुळे आज प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णांचा विस्फोट पाहता प्रशासन आता काही निर्णय घेणार, हे स्पष्ट झाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे चौदा दिवसांचा लॉकडाउन करण्याची सूचना वैद्यकीय व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे शहरात चौदा दिवस पुन्हा लॉकडाउन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, लॉकडाउन तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने जनता कर्फ्यूचा वापर होण्याची शक्यता आहे. 

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय
 
बारामतीत तपासण्यांची संख्या वाढताच कोरोना रुग्णांच्या संख्येचा अक्षरशः उद्रेक झाला. बारामतीत गेल्या 24 तासात 89 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात 208 रुग्ण सापडले आहेत. इतक्या वेगाने रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. आज संध्याकाळी बारामतीत जनता कर्फ्यूची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अनेक जण झपाट्याने पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ही संख्या अजून वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये

दरम्यान, लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रुग्ण संख्येचा वेग असाच राहिला तर व्यवस्था अपुरी पडू नये, या साठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज बारामतीची रुग्ण संख्या तब्बल 1198 झाली असून, मृतांचा आकडा 44 वर गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असून, आजपर्यंत 556 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत.