पारनेर तालुक्याच्या हक्काच पाणी मिळण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय

takli
takli

टाकळी ढोकेश्वर - भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पारनेर तालुक्याची बैठक संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या उपस्थितीत टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे पार पडली यावेळी तालुक्याच्या हक्काच पाणी मिळण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी वाडेकर म्हणाले, तालुक्याच्या चारही बाजुने पाणी असुन, प्रस्थापित राजकीय नेत्यांमुळे, शासनाच्या व लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षामुळे पारनेर तालुका हक्काच्या पाण्यापासुन वंचित आहे.तालुक्याच्या हक्काच पाणी मिळाल पाहीजे. तसेच मुळा नदी बारमाही करण्यासाठी व पिंपळगाव खांडच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात जांबुत, टेकडवाडी, साकुर, मांडवा या चार क्वेटिवेरचा समावेश करावा यासाठी अगामी काळात संघटनेच्या वतीने कायदेशीर मार्गाने गावा- गावात जनजागृती करून समविचारी संघटनांना व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन व्यापक लढा उभारणार आहोत.

पावसाने पाठ फिरविल्याने जिल्हयात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे.रब्बीचेही पिके पावसा अभावी सुकले आहेत पावसाअभावी जळालेल्या पिकांचा त्वरीत पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी व दुष्काळ जाहीर करूण चारा छावण्या सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल मंत्री चंद्रकात पाटील यांना देण्याचे ठरले. संघटनेत नव्याने सक्रीय झालेले संतोष राम वाडेकर यांची नगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.  यावेळी अशोक आंधळे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हांडे, सचिन शेळके, संजय भोर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com