जन्मदात्यांच्या भेटीसाठी पुन्हा लग्न... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - लग्न म्हटले, की लग्नपत्रिका आणि निमंत्रण आलेच ! याच मूल्यांचे महत्त्व सांगणारा विवाहसोहळा जन्मदात्यांच्या भेटीसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी निमंत्रणपत्रिकाही छापली आहे. लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी तरी जन्मदाते येतील, या आशेने स्वीडनच्या दांपत्याने दत्तक घेतलेल्या महिलेने आपल्या पतीबरोबर पुन्हा एकदा विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे - लग्न म्हटले, की लग्नपत्रिका आणि निमंत्रण आलेच ! याच मूल्यांचे महत्त्व सांगणारा विवाहसोहळा जन्मदात्यांच्या भेटीसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी निमंत्रणपत्रिकाही छापली आहे. लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी तरी जन्मदाते येतील, या आशेने स्वीडनच्या दांपत्याने दत्तक घेतलेल्या महिलेने आपल्या पतीबरोबर पुन्हा एकदा विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जेसिका कमलिनी लिंडेर (वय 38) असे या महिलेचे नाव आहे. ग्रेथम असे तिच्या पतीचे नाव असून त्यांना करीटा व जोहन्स ही दोन मुले आहेत. मुंबई येथील सायन हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये 10 ऑक्‍टोबर 1981 रोजी जेसिका दीड वर्षांची असताना बेवारसपणे पोलिसांना सापडली होती. त्यानंतर तिला स्वीडनच्या दांपत्याने दत्तक घेतले. त्यानंतर जेव्हा तिला कळायला लागले तेव्हापासून आपल्या दिसण्यात व आई-वडिलांच्या दिसण्यात फरक दिसत असल्याचे तिला जाणवू लागले. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांकडे चौकशी केल्यानंतर आपल्याला दत्तक घेण्यात आल्याचे तिला समजले. तेव्हापासून तिला आपल्या भारतीय आई-वडिलांविषयी ओढ वाटू लागली. 

त्यांना शोधण्यासाठी ती गतवर्षी भारतात आली होती; मात्र आपल्या जन्मजात्यांना शोधण्यात तिला यश आले नव्हते. त्यानंतर अगेन्स्ट चाइल्ड ट्रफिकिंग नेदरलॅंड या संस्थेच्या सहकार्याने तिने पुन्हा जन्मदात्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेसिकाने आपल्या पतीबरोबर भारतीय पद्धतीने पुन्हा एकदा विवाह करण्याचा निर्णय घेतला. माझ्या लग्नाची बातमी वाचून आशीर्वाद देण्यासाठी माझे जन्मदाते नक्कीच येतील, अशी तिची आशा आहे! 

धनकवडीत उद्या विवाहसोहळा 
जेसिकेच्या या लग्नात धनकवडी येथील मोहननगर परिसरातील सत्यसाईनगर हाउसिंग सोसायटीचे सभासद सहकार्य करीत आहेत. याच सोसायटीत शनिवारी (ता. 14) सांयकाळी चार वाजता तिचे पती ग्रेथम यांच्याबरोबर भारतीय पद्धतीने लग्न लावण्यात येणार आहे. तिची मुले या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या लग्न सोहळ्याकडे जेसिकाचे जन्मदाते खेचले जावेत, यासाठी ही नामी शक्कल असल्याचे सोसायटीचे सभासद दीपक डिंबळे, सुरेश कामठे व अगेन्स्ट चाइल्ड ट्रफिकिंगच्या अंजली पवार व अरुण डोल यांनी सांगितले. 

Web Title: decision of an Indian woman adopted by a Swedish couple