आळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय?

आळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय?

आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यालयात सोमवारी (ता. २) याबाबत महत्वपूर्ण बैठक पोलिस महसूल आणि आळंदी देवस्थान यांची होणार आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणारी कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी  (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे.  ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत यात्रा भरते. सात दिवस लाखोंचा समुदाय एकत्रीत तळ देवून असतो.  दुकाने, हॉटेल व्यावसायिक दिंड्यांना अगोदर तयारी करावी लागते. यातच कोरोनाची दुसरी लाट आली तर काय करायचे याबाबत स्थानिक देवस्थान आणि प्रशासन विचार विनिमय करत आहे.

यानिमित्ताने खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी पालिकेत यात्रा नियोजनाची आढावा बैठक (गुरूवारी) पार पडली. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर, विवेक लावंड, मुख्याधिकारी अंकूश जाधव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, अॅड विकास ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड विकास ढगे म्हणाले, ''मंदिर उघडण्याबाबत निर्णय न झाल्याने वारीबाबत ठाम सांगता येणार नाही. कार्तिकी वारीसाठी जास्तीत जास्त वारक-यांना समावून घ्यावे यासाठी मागणी केली. मंदिर उघडण्याचा तसेच वारीबाबतचा निर्णय लवकर झाला तर आळंदीत येणा-या दिंड्यांना देवस्थानकडून सूचना दिल्या जातील. कार्तिकी वारीसाठी देवस्थानला तसेच इतर यंत्रणांना महिनाभर आधी तयारी करावी लागते. यामधे पोलिस महसूल यांनाही नियोजन करावे लागते. पंरपेरने येणारी संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या दिंडी यांच्याबाबतही परंपरा खंडीत न होण्याच्या दृष्ट्रीने देवस्थान सकारात्मक आहे. दर्शनबारी मागील वर्षीच्या जागीच होईल. वारीपूर्वी कोरोनाबाबतची खबरदारी सर्वांना घ्यावी लागेल.'' 

दरम्यान सोमवारी (ता. २) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत सुरक्षेच्या दृष्ट्रीने आणि कार्तिकी वारीतील वारक-यांच्या संख्येबाबत बैठक होणार असून, त्यामध्येही सरकारकडे वारक-यांच्या भावना पोचवल्या जातील. दरम्यान मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय काय घेते यावरही पुढील नियोजन अवलंबून असणार असल्याचे ढगे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्याधिकारी अंकूश जाधव म्हणाले, ''पालिकेने वारीच्या दृष्टीने निविदा प्रक्रियेस सुरूवात केली. धर्मशाळा, मठ यांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अधिक खबरदारी घेण्याच्या पूर्वसूचना लवकरच दिल्या जातील. वारीबाबत जिल्हा प्रशासनाकडूनही राज्य शासनाकडे समाधी सोहळा साजरा कसा करायचा याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com