
कालच्या प्रतिक्षेतील 56 नमुन्यांमध्ये 10 जण पॉझिटीव्ह सापडले. काल दिवसभरात आरटीपीसीआर 238 तपासण्या करण्यात आल्या, त्यात 35 जण पॉझिटीव्ह सापडले. 167 तपासण्या रॅपिड अँटीजेनच्या झाल्या त्या पैकी 40 जण पॉझिटीव्ह आढळले. काल दिवसभरात सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 44 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.
बारामतीत रुग्णसंख्या घटू लागली; आज होणार लॉकडाऊनबाबत निर्णय
बारामती : शहरातील कोरोनाचा आलेख हळुहळू खाली येऊ लागला आहे. काल दिवसभरात 85 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले असून कोणाचाही अहवाल प्रतिक्षेत नाही. दरम्यान काल बारामतीच्या रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला. बारामतीतील रुग्णसंख्या आता 2055 इतका झाला आहे. मात्र त्याच वेळेस बरे झालेले रुग्णही 971 वर जाऊन पोहोचले आहेत. मृत्यूचा आकडाही काल 55 वर गेला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कालच्या प्रतिक्षेतील 56 नमुन्यांमध्ये 10 जण पॉझिटीव्ह सापडले. काल दिवसभरात आरटीपीसीआर 238 तपासण्या करण्यात आल्या, त्यात 35 जण पॉझिटीव्ह सापडले. 167 तपासण्या रॅपिड अँटीजेनच्या झाल्या त्या पैकी 40 जण पॉझिटीव्ह आढळले. काल दिवसभरात सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 44 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.
आकडेवारीवर नजर टाकली तर व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण केवळ 10 आहेत, तर गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 32 इतकी आहे. ज्यांची काळजी करावी अशा रुग्णांची संख्या फक्त 42 इतकी आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते आहे असे रुग्ण 50 आहेत. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 520 इतकी तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 410 इतकी आहे.
मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
बारामती तालुक्यातील 99 पैकी तब्बल 83 ग्रामपंचायती या कोविडबाधित आहेत तर केवळ 16 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अद्यापही कोरोनाची लागण झालेली नाही. पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या ग्रामपंचायतींची संख्या तब्बल 38 इतकी आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याचेच हे निदर्शक आहे.
दरम्यान सोमवारी (ता. 13) बारामतीतील माळेगाव, पणदरे व गुनवडी या तीन गावात अँक्टीव्ह सर्व्हे केला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्थाची थर्मल स्क्रिनींग व ऑक्सिजन लेव्हल तपासली जाणार आहे.
- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
आज लॉकडाऊनबाबत निर्णय होणार...
दरम्यान आज पाच वाजता उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात बैठक असून लॉकडाऊन बाबत आज निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Title: Decision Regarding Baramati Lockdown Will Be Taken Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..