ajit pawar
sakal
माळेगाव - राज्यातील आगामी गळीत हंगाम आॅक्टोंबर की नोव्हेंबरामध्ये सुरू करायचा, एफआरपी एकरकमीचा मुद्दा, ऊस उत्पादन वाढीत एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण, ऊस तोडणी मजूरांचा प्रश्न आदी साखर उद्योगातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांसह आम्ही मंत्री समितीच्या बैठकीत (३० सप्टेंबर) मार्गी लावणार आहे.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या वार्षिक सभेत स्पष्ट केली. याचवेळी त्यांनी मांडलेल्या ७१ कोटींच्या महत्वाकांक्षी सीबीजी गॅस प्रकल्प उभारण्याच्या विषयालाही माळेगावच्या सभासदांनी मान्यता दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.