पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील निर्मला पानसरे तर, उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजीत शिवतरे यांची निवड करण्यात आली आहे. 

पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील निर्मला पानसरे तर, उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजीत शिवतरे यांची निवड झाली आहे. 

या निवडीने खेड तालुक्याला पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. पानसरे या खेड तालुक्यातील रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या आहेत. याआधी त्यांनी बहुळी गावच्या सरपंचपदी काम केले आहे.

Video : 'सारथी बचाव'; छत्रपती संभाजीराजेंच्या हाकेला एकवटले मराठा तरुण

शिवतरे हे भोर तालुक्यातील उत्रोली-कारी गटातून निवडून आले आहेत. शिवतरे यांनी याआधी २००७-०९ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी काम केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता विशेष सर्वसाधारण सभा झाली. या सभेत या दोघांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

सारथी बचाव : खासदार छत्रपती संभाजीराजेंचे पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Declared New President, Vice President of the Zilla Parishad

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: