shirur.jpg
shirur.jpg

दुष्काळामुळे शिरूरमध्ये आठवडे बाजारात खरेदीसाठी शुकशुकाट

टाकळी हाजी : आनंदाचा सण दिवाळी...गोड-धोड खाऊ बरोबर खरेदीची लयलुट करायची दिवाळी. पण या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यात शेतमालाला पडलेले बाजारभाव यामुळे शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात आठवडे बाजारात खरेदीसाठी शुकशुकाट पहावयास मिळाला.

ग्रामीण भागात आठवडे बाजारात नेहमीच खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळते. दिवाळी सारख्या सणाला सर्व गृहउपयोगी वस्तूंचा बाजार भरतो. या वर्षी देखील दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूसांठी बाजार फुलला होता. शाळेला सुट्टी लागल्याने चिमुकल्यांनी किल्ले बनविले. बाजारात विविध प्रकारचे चित्रे विक्रीसाठी येतात. यासाठी हे चिमुकले खेरदीसाठी गर्दी करतात. मात्र गेल्या वर्षीच्या चित्रांची मांडणी करून किल्ले सजविलेले पहावयास मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजारात आलेल्या या दुकानदारांकडे पाठ फिरवलेली दिसून येते.

विविध आकराच्या पणत्या, लक्ष्मीच्या हातातील पणत्या ह्या देखील या आठवडे बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. केरसुणी, करदोडा यासारखी दुकाने सजलेली होती. पण ग्राहकांचा अभाव असल्याचे चित्र आठवडे बाजारात पहावयास मिळत होता. शेत मालाला बाजारभाव नसल्याने आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात माल येवूनही ग्राहक नसल्याचे चित्र होते. फराळाचे साहित्य बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांसाठी दुकाने लावली होती. एकंदर या वर्षीची दुष्काळी परिस्थीती पहाता शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट या वर्षीच्या दिवाळी सणावर दिसत आहे.
 
वर्षभर मातीवर प्रक्रिया करून पणत्या, खेळणी तयार करायाची. त्यातून मिळणाऱ्या पैशातून दिवाळी साजरी करावयाची. पण, शेतकऱ्यांकडेच पैसा नसल्याने आमच्या मालाची विक्री होत नसल्याची प्रतिक्रिया खेळणी विक्रेत्यांमधून आली. 

या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने दिवाळी सणावर त्याचे सावट दिसत आहे. कांदा सारख्या पिकाला बाजारभाव नसल्याने कांदा कांदा चाळीत सडू लागला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने आठवडेबाजारात शुकशुकाट दिसू लागला आहे.
- बबनराव शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com