बाणेरमधील कोविड हॉस्पिटल फक्त नावापुरतेच का? 

covid center.jpg
covid center.jpg

बालेवाडी (पुणे) :  नुकतेच 28 ऑगस्ट रोजी मोठया डामडौलात बाणेर येथील महापालिकेच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व सुविधा उपलब्ध असलेले रुग्णालय असून दोन दिवसात हे सुरू होणार असल्याची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पण आज सहा दिवस होऊनही या ठिकाणी एकाही रुग्णावर उपचार केले गेलेले नाहीत.

नुकतेच महापालिका व राज्य शासनाने उभारलेल्या शिवाजीनगर येथील जंबो रुग्णालयात अपुऱ्या सुविधा व व्यवस्थित उपचार न मिळाल्याने टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर (वय  42) यांचे करोनाने निधन झाले. यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी  वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही.  तसेच व्हेंटिलेटरसाठी प्रयत्न करूनही त्यांना वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर बाणेर येथील कोविड रुग्णालयाची वस्तुस्थिती समोर आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाणेर येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचा उदघाटन सोहळा आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी तत्पर असलेले राजकीय नेतृत्व आणि प्रशासन इथल्या सोई सुविधांच्या अंमलबजावणी करण्यात मात्र, तेवढी तत्परता अद्याप दाखवता आलेली नाही. शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने बाणेर येथील सर्व्हे नंबर 109 मध्ये महापालिकेकडून 314 खाटांचे सर्व सुविधांनी युक्त असे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. या ठिकाणी 270 ऑक्सिजन बेड,  44 आयसीयू बेड ही आहेत. हे रुग्णालय वीस दिवसात सज्ज करून घाईघाईने या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु अजूनही रुग्णालय सुरू झालेले नाही.  रुग्णालयाचे काम पूर्ण झालेच नव्हते तर उद्घाटनाची एवढी घाई का करायची?   असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. या रुग्णालयात अजून उपचार सुरु न केल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे.

 या रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क  होऊ शकला नाही. उद्यापासून हे रुग्णालय सुरु होईल अशी जुजबी  माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. विभागीय आयुक्तालयाच्या वतीने बेड उपलब्धतेसाठी सुरु करण्यात आलेल्या डॅश बोर्डवर अद्याप या रुग्णालयाची माहिती देण्यात आलेली दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com