नाट्य परिषद कार्यकारिणीवर दीपक रेगे यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवर दीपक रेगे यांची निवड झाली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदा पुण्यातील रंगकर्मी मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारिणीवर निवडून आला आहे. प्रसाद कांबळी यांच्या नेतृत्वात 16 उमेदवारांची निवड कार्यकारिणीवर झाली. अभिनेते मोहन जोशी यांच्या पॅनेलचे तीन उमेदवार निवडून आले. 

कांबळी (अध्यक्ष), डॉ. गिरीश ओक, नरेश गडेकर (उपाध्यक्ष), जगन्नाथ चितळे (कोशाध्यक्ष), शरद पोंक्षे (प्रमुख कार्यवाह), सतीश लोटके, अशोक ढेरे, सुनील ढगे (सहकार्यवाह), कार्यकारिणी सदस्यपदी अनुक्रमे मधुरा वेलणकर, रेगे, भरत जाधव, अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, संदीप जंगम, आनंद खरबस, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन आदींची निवड झाली आहे. 

रेगे हे गेली तीसहून अधिक वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांनी "रायगडाला जेव्हा जाग येते', "कुर्यात सदा टिंगलम्‌', "कुलकर्ण्यांचे स्थळ', "ही श्रींची इच्छा', "नाथ हा माझा', "संगीत स्वयंवर', "संगीत स्वरसम्राज्ञी' या नाटकांतून वेगवेगळ्या भूमिका वठविल्या आहेत. सध्या ते "शेजारी शेजारी...लै भारी' हा एकपात्री प्रयोग सादर करत आहेत. सहा एप्रिलला झालेल्या निवडणुकीत मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळावर निवडून गेलेल्या 60 जणांमधून 19 जणांच्या मुख्य कार्यकारिणीसाठी मतदान झाले. त्यामध्ये पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह रेगे यांना 60 पैकी 37 मते मिळाली.

Web Title: Deepak Rege selection on the akhil bhartiya natya parishad