पाण्याच्या शोधातील हरणाच्या पाडसाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू

संतोष आटोळे 
रविवार, 20 मे 2018

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, पारवडी, गाडीखेल, साबळेवाडी भागात वन विभागाच्या आधिपत्याखाली हजारो एकर क्षेत्र आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण, नालाबांध, मातीनाला, समतल चर या सारख्या योजना राबवल्या जातात. या वनक्षेत्रामध्ये हरणे, ससे, कोल्हे, तरस, घोरपडी आदी वन्यजीवांचा वावर असतो.

 शिर्सुफळ (बारामती) : येथील बोत्राई ओढ्याच्या जवळ भिगवणकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या हरणाच्या मादी पाडसाचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, पारवडी, गाडीखेल, साबळेवाडी भागात वन विभागाच्या आधिपत्याखाली हजारो एकर क्षेत्र आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण, नालाबांध, मातीनाला, समतल चर या सारख्या योजना राबवल्या जातात. या वनक्षेत्रामध्ये हरणे, ससे, कोल्हे, तरस, घोरपडी आदी वन्यजीवांचा वावर असतो.

सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासह निवऱ्यासाठी भटकंती होत आहे. याचा परिणाम रविवारी सकाळी शिर्सुफळ वन क्षेत्रालगत असेलेल्या बोत्राई ओढ्याच्या जवळ हरणाच्या मादी पाडसाचा अज्ञात वाहनांना धडक दिली. त्यामार्गावरुन जाणारे पारवडी गावचे सुधाकर होले यांनी त्या जखमी हरणाला उपचारासाठी शिर्सुफळ येथील पशुवैद्यकिय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. आबा आटोळे व डॉ. नितीन गोलांडे यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र, उपचारा दरम्यान हरणाचे पाडस मरण पावले. यामुळे हळहळ शिर्सुफळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर वन्य प्राण्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याची मागणी स्थानीक नागरीक करत आहेत.

Web Title: deer died on road accident