

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा : खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
पंढरपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा पराभव झाला असला, तरी सोलापूर जिल्ह्यात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दिलेला आमचा लढा यशस्वी ठरला आहे, अशी प्रतिक्रिया माढ्याचे खासदार तथा शरद पवार गटाचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.
निवडणुकीत जय-पराजय होत असतात. आम्ही पराभव खुल्या मनाने स्वीकारला आहे. विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन करतो. त्यांनी राजकीय द्वेष न बाळगता जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावे आणि सर्वांना समान न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आम्ही हा लढा मोठ्या धैर्याने लढलो. यापुढेही सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्ष सुरूच राहील. मतदारांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा कायम ठेवणार आहोत.
-------------
मतदारांना न्याय मिळाला : वसंतराव देशमुख
विधान परिषद निवडणुकीमुळे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला, हेच आमच्या दृष्टीने मोठे यश असल्याची प्रतिक्रिया पराभूत उमेदवार वसंतराव देशमुख यांनी व्यक्त केली.
देशमुख म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला २०० हून अधिक मते मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि बळाचा वापर केला. राजकीय नेते तसेच मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अनेक मतदारांना नाईलाजास्तव सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जावे लागले. ही निवडणूक लढणे गरजेचे होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस केले. या निवडणुकीमुळे सत्ताधाऱ्यांना मतदारांपर्यंत जाऊन त्यांची मनधरणी करावी लागली. त्यामुळे मतदारांना न्याय मिळाला, हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे यश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.