देहूरोड येथे गोळ्या झाडून तरुणाचा खून

देहूरोड येथे गोळ्या झाडून तरुणाचा खून
Published on

पिंपरी, ता. २८ : अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना देहूरोड येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. ‘‘या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी,’’ या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी सुमारे पाऊण तास जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला.
रमेश गुरुस्वामी रेड्डी (वय ४०, रा. गांधीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘
रमेश हे देहूरोड बाजारपेठेतील नेहरू मंगल कार्यालयाजवळ असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात रमेश गंभीर जखमी झाले. स्थानिक व्यक्तींनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.’’
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही देहूरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, रमेश यांचे भाऊ विक्रम रेड्डी यांचाही फेब्रुवारी-२०२५ मध्ये गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

PNE26W15668

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com