देहूरोड-निगडी रस्ता दुरुस्तीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

देहूरोड - निगडी-देहूरोड चौपदरीकरणाचे तीनतेरा, उपाययोजनांकडे प्रशासनाचा काणाडोळा या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ३१) प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तातडीने दखल घेतली. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विश्वास गांगुर्डे यांनी चौपदरीकरणाचे करणाऱ्या पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. कंपनीकडून संबंधित माहिती घेऊन उघडीप मिळताच दुरुस्तीचा आदेश दिला.

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तात चौपदरीकरण मार्गात निगडी ते देहूरोडदरम्यान जुन्या मार्गावर पावसाने; तसेच चौपदरीकरण कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, मार्गाखालून भूमिगत पाइप टाकल्यावर खड्डे बुजविल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा, सुरक्षा उपायांचा अभाव आदींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 

दुरवस्था मान्य
पीबीए कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती, अशी की चौपदरीकरण कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली हे मान्य आहे. या दुरुस्तीसाठी कंपनीची १२ ते १३ लोकांची एक टीम राबत आहे. परंतु, पावसामुळे अडथळा आला. उघडीप मिळताच डांबर टाकून सरसकट रस्त्याची दुरुस्ती करणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रिफ्लेक्‍टर लावले आहेत. ते अधिक संख्येने लावण्याचे काम सुरू आहे. मार्गातील झाडांचा मुद्दा हरित लवाद दप्तरी आहे. त्यावरील अंतिम सुनावणी बाकी आहे. त्यामुळेही प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यास तीन महिने विलंब झाला.

उड्डाण पुलाचे काम ४० टक्के पूर्ण 
उड्डाण पुलाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी बेरिकेट्‌सही लावले आहेत, अशी माहिती टी. अँड टी. इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. कंपनीचे अधिकारी अमोल थोरवे यांनी दिली.

Web Title: dehuroad pune news road repairing order