Video : नाले सफाईचा पुणे महापालिकेचा दावा ठरतोय फोल ?

gokhlenagar.jpg
gokhlenagar.jpg
Updated on

गोखलेनगर (पुणे) : गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत येथे वेताळ टेकडीवरुन नाल्यामार्गे येणारे पाणी पाऊस जास्त आला की जनता वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात जाऊन घरातील जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे असते. परंतू, पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून देखील नालेसफाई झालेली दिसत नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे झाडे नाल्यात पडलेली आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधींनां सांगून देखील ही झाडे काढली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वेताळ टेकडी, निलज्येती सोसायटी, गजानन महाराज उद्यान नाला, वैदुवाडी, अाशानगर नाला, पठाण वस्ती वैदुवाडी स्मशानभूमी, जनता वसाहत, सुयोग नगर नाला
श्रमिक नगर या भागात नाले असून नाल्यांमध्ये असलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. घरी पाण्यात जाण्यापूर्वी नालेसफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

"काही प्रमाणात नाल्याची साफसफाई झाली आहे. कंटेनमेंट झोन असल्यामुळे नालेसफाई करायला वेळ लागत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत नाले पूर्णपणे सफाई होईल"
       -मुकेश पवार, कनिष्ठ अभियंता

"माझ्या घराच्या पाठीमागे एक नाला आहे. तो दिवसेंदिवस गलिच्छ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. डासांचे प्रमाण वाढले आहे.महापालिकेकडून स्वच्छता करण्यात यावी"
         -उमेश कदम, रहिवासी गोखलेनगर

"मागील अनेक दिवसापासून नाला तुंबलेला आहे. झाड पडलेली आहेत. ते काढत नाहीत. त्यामुळे कचरा थांबत आहे. आमच्या झोपडपट्टीला कोणीही डोकावून बघत नाही. कोरोनाने मरू न मरु परंतु वासाने मरण्याची भीती वाटत आहे"
- शकिला शेख, जनवाडी जनता वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com