esakal | मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...
sakal

बोलून बातमी शोधा

Commissioner Mundhe should issue a public apology

मोमिनपुरा येथून बिर्याणी आणली हे डॉक्‍टर गंटावार यांचे म्हणणे खरे असेल तर महापालिका आयुक्त काय कारवाई करणार असाही सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. कोरोना संख्या घटताच आमच्या प्रयत्नांमुळे हे झाले असे सांगून श्रेय घेतात. आता चुकी झाली असेल तर याची जबाबदारीसुद्धा मनपाने घ्यावी, असेही ते म्हणाले. 

मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मोमिनपुरा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असताना येथून बिर्याणी तसेच मांसाहाराची विक्री कशी झाली याचे उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावे. तसेच याची जबाबदारी महापालिकेने घेऊन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. 

मोमिनपुरा येथून बिर्याणी मागवल्यामुळे नाईक तलाव परिसरात एकाच दिवशी सातशे लोकांना संसर्ग झाला होता. त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉ. गंटावार यांनी दिली. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात मांस विक्री कशी झाली?, कोणी परवानगी दिली?, छुपी विक्री सुरू आहे का? असे अनेक प्रश्‍न यामुळे निर्माण झाले आहेत.

हेही वाचा - नितीन गडकरींच्या मते अर्थव्यवस्था मजबूत करण्यात हे मंत्रालय बजावणार चोख भुमिका

मोमिनपुरा येथून बिर्याणी आणली हे डॉक्‍टर गंटावार यांचे म्हणणे खरे असेल तर महापालिका आयुक्त काय कारवाई करणार असाही सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. कोरोना संख्या घटताच आमच्या प्रयत्नांमुळे हे झाले असे सांगून श्रेय घेतात. आता चुकी झाली असेल तर याची जबाबदारीसुद्धा मनपाने घ्यावी, असेही ते म्हणाले. 

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून उद्रेक सुरू आहे. रुग्णांची संख्या आठशेच्या घरात पोहोचली आहे. मनपातर्फे फक्त क्वारंटाइन करण्याचे काम सुरू आहे. मेडिकल, मेयो इतर इस्पितळातील डॉक्‍टर आणि कर्मचारी जोखीम घेऊन त्यांच्यावर उपचार करीत आहेत. मात्र, मुंढे आपणच सर्व करीत असल्याचे दर्शवित आहे. एकाच दिवशी सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली हेसुद्धा आयुक्तांनी सागावे, असे दयाशंकर तिवारी म्हणाले.

क्लिक करा -  50 वर्षांपूर्वी मिळविला होता विदर्भाने ग्वाल्हेरमध्ये अविस्मरणीय विजय

दुकान उघडण्याची परवानगी नाकारली होती

आपले रेल्वे रिझव्हेशन तिकाटेच सेंटर आहे. वर्धमानगरातील दुकान उघण्यास आपणास मंजुरी द्यावी अशी विनंती आयुक्तांकडे केली होती. मात्र, तुमचे घर प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने दुकान उघडण्याची परवानगी नाकारण्यात आली. मग मोमिनपुरा क्षेत्रात मांस विक्री कशी काय सुरू आहे, याचेही उत्तर आयुक्तांनी द्यावे अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली.