
पुणे : नागरिकांना घरबसल्या गरमागरम आणि स्वादिष्ट पदार्थ खाता यावे म्हणून कोरोनाच्या परिस्थितीतही फूड डिलिव्हरी बॉय रस्त्यावर आहेत. मात्र संसर्गाच्या भीतीने अनेकजण कामावर येत नसल्याने आणि ऑर्डर कमी झाल्याने जेवण पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवरच उपासमारीची वेळ आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कामावर गेल्यानंतर पुरेसे पैसे मिळत नसल्याने किंवा कोरोनाच्या भीतीने घरीच बसल्याने या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना रोजगार पुरवणाऱ्या कंपन्यांनी मात्र या परिस्थितीत हात वर केले आहेत.
कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात झोमॅटो, स्विगी आणि उबेर ईटसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांसाठी सुमारे 25 हजार डिलिव्हरी बॉय कार्यरत आहेत. त्यातील जवळपास तीन हजार लोकच कामावर असून मास्क वगळता त्यांना सुरक्षेचे कोणतेही साधन पुरविण्यात आलेले नाही. मात्र घरी थांबलो तर किराणासाठी पैसे कुठून आणायचे, अशी परिस्थिती असल्याने जीवावर उदार होऊन हे लोक काम करत आहेत.
डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरसाठी 20 ते 30 रुपये मिळत असतात. पूर्वी आठवड्याचे सहा ते आठ हजार रुपये मिळत. मात्र सध्या दोन हजार रुपये देखील मिळने मुश्कील झाले आहे, अशी माहिती काही डिलिव्हरी बॉईजने दिले. भारतीय मजदूर संघटनेकडून बॉईजसाठी किराण्याचे 40 किट उपलब्ध करुन देण्यात आले होते.
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी
पेट्रोलचा खर्च वाढला :
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे डिलिव्हरी देण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाढला आहे. मात्र तुलनेत उत्पन्न कमीच होत चालले असल्याची व्यथा बॉईजने मांडली.
पुणे : वाईन शॉपी, बिअर शॉपी केव्हा राहणार खुली?..वाचा सविस्तर
कॅश वापरायला मिळत नाही :
संसर्ग टाळण्यासाठी रोख रक्कम हाताळू नये, असे निर्देश कंपन्यांनी दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच पैसे घेण्यात येत आहेत. पूर्वी रोख रक्कम घेण्यात येत. त्यामुळे ते पैसे काही दिवस आम्हाला पेट्रोल किंवा इतर खर्चासाठी वापरता येत होते. मात्र आता पगार होण्यासाठी गुरुवारची वाट पाहावी लागते. प्रत्येक आठवड्यात आमचा पगार होत असतो. दैनंदिन खर्चासाठी प्रत्येक डिलिव्हरी बॉयला एक हजार रुपये द्या, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र ती फेटाळण्यात आल्याचे धनंजय निंबाळकर यांनी सांगितले.
डीएसकेंच्या कुत्रे अन् मांजरांबाबत न्यायालयात काय झाले वाचा...
किराणा आणि पैसे दोन्ही संपले :
मार्चनंतर मी कामावर गेलो नाही. सुरक्षेविषयक बाबी आणि पुरेसे पैसे मिळत नसल्याने कामावर जाण्यास देखील भीती वाटत आहे. सध्या माझ्या घरात असणारा किराणा आणि खिशातील पैसे संपले आहे. पत्नी, आई आणि दोन मुलं असलेले कुटुंबात मी एकटाच कमावता आहे. या परिस्थितीतमुळे माझे कुटुंब हवालदिल झाले आहे, असे डिलिव्हरी बॉय अजय भांडेकर यांनी सांगितले. भांडेकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.