कर्णबधिरांवर लाठीचार्ज लाजिरवाणा; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

pune.jpg
pune.jpg

पुणे : कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी (ता.25) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकारचा निषेध विविध ठिकाणी राजकीय पातळीवर होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.

 
सत्यजीत तांबे यांनी हलीमाबी कुरेशी यांनी ट्विटरवर टाकलेला व्हिडीओ रिट्विट करत ''भाजप सरकारने असंवेदनशीलतेचा कहर केला आहे'' असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना उद्देशून या प्रकाराचा धिक्कार केला.

विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ''मूकबधीर बांधवांवर लाठीचार्ज करून सरकारने असंवेदनशीलपणाचा कळस गाठला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यांची गृहमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करावी.'' अशा शब्दात टिका केली. ''शिक्षणासाठीच आंदोलन करतायेत ना माझे मूकबधीर बांधव? कुणाचा खुन किंवा चोरी तर नाही केली त्यांनी? राज्यात गुंडांचा सुळसुळाट वाढलाय त्यावर काहीच कारवाई नाही. पण मूकबधीरांवर लाठीचार्ज केला जात आहे? गृहमंत्र्यांनी उद्याच सभागृहात याबाबत स्पष्टीकरण द्यावे.'' अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
&

याबाबत ''पुणे जिल्ह्यातील कर्णबधिर तरुण तरुणींनी आपल्या काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा काढला होता. बोलूही न शकणारे हे तरुण अत्यंत शांतपणे आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी आले होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याइतपत पोलिसांची मजल जातेच कशी? या राज्याला सक्षम गृहमंत्री असावा अशी आमची पाहिल्यापासूनची मागणी आहे; आणि ते वारंवार खरे ठरत आहे. शांतपणे मोर्चा काढणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला, की ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णतः अयशस्वी ठरले असून त्यांनी आजच्या प्रकारानंतर तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com